आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये होणार इंटिरियर डिझायनर्स जल्लोष:11 ते 13 फेब्रुवारीदरम्यान 'आयआयआयडी' तर्फे डी शोकेस 2023 -डिझाईन एक्स 'चे आयोजन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटिरियर डिझायनर्स यांची राष्ट्रीय संस्था इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिजाइनर ( आय .आय .आय. डी) च्या नाशिक चॅप्टरतर्फे येत्या 10, 11 आणि 12 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय भव्य नॉलेज फेस्ट आयआयआय डी शोकेस 2023 -डिझाईन एक्स 'चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची घोषणा आज एका कार्यक्रमात करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेच्या नाशिक चॅप्टर च्या अध्यक्षा आर्कि. वैशाली प्रधान , प्रदर्शनाच्या समन्वयक आर्कि. तरन्नुम काद्री, कोषाध्यक्ष आय. डी हकीम सिन्नरवाला, आय. डी प्रसाद गणोरे, आर्किटेक्ट स्मिता वाणी, आय. डी अनिल राका, आय. डी अतुल बोहरा, आर्किटेक्ट संजय पाटील आर्किटेक नितीन कुटे, आर्किटेक्ट धनंजय शिंदे, आर्किटेक्ट सागर काब्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

इंटिरियर डिझायनर्स क्षेत्रात नवनव्या ज्ञानाचे आदान प्रदान करतात. निरंतर प्रशिक्षण, मूल्यवर्धित सेवा या उद्देशाने 1972 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिजाइनर या संस्थेची सुरुवात करण्यात आली. आजमितीला देशभरात 31 चॅप्टर च्या माध्यमातून 8000 अधिक सदस्य या संस्थेशी जोडले गेले आहेत. आय.आय.आय. डी हे संस्था आंतरराष्ट्रीय संगठना आशिया पॅसिफिक स्पेस डिझाईनर अलयांस सोबत संलग्न आहे.

या प्रसंगी बोलताना अध्यक्षा आर्की. वैशाली प्रधान म्हणाल्या की, भारतात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक नाशिकचे आकर्षण सर्वानाच आहे. उत्तम हवामान, मुबलक पाणी, उद्योग व्यवसायाच्या अनेक संधी यामुळे नाशिक बाहेरून नाशिकला स्थायिक होण्याचा ओघ वाढला आहे. यासोबतच शहरातील रहिवाशांचे सरासरी उत्पन्न आणि लाईफ स्टाईल यामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. त्यामुळेच कोणतीही वास्तू घेतल्यानंतर तेथील जागेचा योग्य आणि उपयुक्त वापर करण्यासाठी सुयोग्य इंटरियर डिझाईन असावे या विचारात भर पडली आहे.

इंटिरियर डिझाईन क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान व वस्तू तसेच अनेक नवे पर्यावरण पूरक उत्पादने दाखल झाली आहेत या सर्वांचे एकत्रित प्रदर्शन हे नाशिककर यांना 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान ठक्कर डोम येथे पाहता येईल असेही त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना समन्वयक आर्किटेक्ट तरन्नूम कादरी म्हणाल्या सेलिब्रेटिंग लाइफ थ्रू डिझाईन” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रदर्शन न ठरता हा शहराचा डिझाईन जल्लोष ठरणार आहे यामध्ये विविध नामवंत आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांसोबत विविध वर्कशॉप विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट कॉर्नर डिझायनर अरेना कार्निवल स्ट्रीट अशी विविध आकर्षणे येथे राहणार आहे. आपले अनुभव आणि कौशल्य वापरून इंटिरियर डिझायनर वास्तुला राहण्यास योग्य करत असतात त्यामुळे शहराच्या एकूणच लाईफस्टाईल मध्ये इंटिरियर डिझायनरचे काम महत्त्वपूर्ण असल्यासही त्यांनी नमूद केले. प्रदर्शन कालावधीमध्ये देशातील डिझाईन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती नाशिकला येणार असून त्यांचे मार्गदर्शन नाशिककरांना घेता येईल

बातम्या आणखी आहेत...