आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दुबईत झाली इंटरनॅशनल इनोव्हेटिव्ह एज्युकेशन समीट; जेएमसीटी स्कूलचा दुबईत पुरस्काराने गौरव

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई येथे झालेल्या इंटरनॅशनल इनोव्हेटिव्ह एज्युकेशन समीट कार्यक्रमात शहरातील जेएमसीटी इंटरनॅशनल स्कूलला ‘इलिएट स्कूल ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जेएमसीटी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमिक मुख्याध्यापिका डॉ. चित्रा घस्ते यांना ‘दि मोस्ट डायनॅमिक यंग लीडर ऑफ द इंडिया’ तर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोफिया रिजवी यांना ‘आउटस्टँडिंग लीडरशिप अवॉर्ड’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

दुबई येथे २७ मार्चला इंटरनॅशनल इनोव्हेटिव्ह एज्युकेशन समीट सोहळा झाला. सूरश्री रिमा महाजन (संस्थापक आयडब्ल्यूडी भारतीय महिला, दुबई) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तीन पुरस्कार पटकावत शाळेने पुरस्कार सोहळ्यात शहराचे नाव उंचावले. शालेय व्यवस्थापनाचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य, कामाप्रति समर्पित मुख्याध्यापक, सदैव कार्यासाठी तत्पर असणारा शाळेचा कर्मचारीवर्ग आणि कार्यासाठी सदैव प्रेरणा देणारा शाळेचा पालकवर्ग या सर्वांमुळे शाळेला हे यश गाठता आले, असे मत पुरस्कारार्थींकडून व्यक्त करण्यात आले. सोहळ्यात डॉ. रितिका आनंद (प्राचार्या, देइरा प्रायव्हेट स्कूल, दुबई) आणि ब्रजेश माहेश्वरी (सहसंस्थापक संचालक, एलेन करिअर इन्स्टिट्यूट) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.जेएमसीटी इंटरनॅशनल स्कूलला यापूर्वीही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. संस्थेचे अध्यक्ष हाफिज हिसामोद्दिन खतीब, सचिव जाहिद खतीब, विश्वस्त हाजी रऊफ पटेल, साबीर खतीब, शेखन खतीब तसेच एहसान खतीब, गाझी खतीब आदींकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...