आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:वडिलांपाठोपाठ आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हेंचे एकाच दिवशी निधन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माेनाली यांनी भारताच्या युवा नेमबाज संघाच्या सहायक प्रशिक्षक व श्रीलंकेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते

नेमबाजी प्रशिक्षक माेनाली गाेऱ्हे (४१) यांचे गुरुवारी सकाळी काेराेनानंतर उद‌्भवलेल्या गुंतागुंतीच्या त्रासामुळे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्यापूर्वी काही तास आधीच वडील मनाेहर गाेऱ्हे (७८) यांचेही त्याच त्रासाने निधन झाले.

काही दिवसांपूर्वी माेनाली व वडिलांना काेराेना झाला होता. दाेघांनी त्यावर यशस्वीपणे मात केली हाेती. मात्र काेराेनानंतर उद‌्भवलेल्या त्रासामुळे त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात अाले होते. माेनाली यांनी भारताच्या युवा नेमबाज संघाच्या सहायक प्रशिक्षक व श्रीलंकेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. भारतीय संघास प्रशिक्षण देताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्यपदक प्राप्त केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...