आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध आजारांनी त्रस्त असलेल्या संगमनेर येथील ६३ वर्षीय वृद्धावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखालील वोक्हार्ट रुग्णालयातील कार्डियाक अॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. वर्षा कुलकर्णी, परफ्युजनिस्ट लक्ष्मण माने, विवेक पॉल आणि सहायक समाधान यांचा समावेश असलेल्या त्यांच्या टीमने ही पहिली दुर्मिळ, आव्हानात्मक आणि अशाप्रकारची पहिलीच गुंतागुंतीची कार्डियाक सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली.
नामदेव पोपेरे यांना इंटरस्टिशियल लंग डिसीज हा फुप्फुसाचा आजार आहे. त्यांना श्वासोच्छ्वासाचा तीव्र त्रास असल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते व त्यांना खोकल्याचा दीर्घ इतिहास होता. त्यांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. एक्स-रेद्वारे मध्य आणि खालच्या दोन्ही भागांमध्ये अनेक रेटिक्यूलर ओपॅसिटीज दिसून आल्या होत्या. खालच्या लोब्समध्ये दोन्ही बाजूंना कमी ल्युसेंट पोकळी आढळून आल्या. हे इंटरस्टिशियल फुप्फुसाच्या आजाराचे संकेत होते. उच्च रिझोल्यूशनच्या सिटी थोरॅक्स करण्यात आलेल्या रुग्णामध्ये याची पुष्टी झाली.
त्याच्या केवळ छातीच्या भागाला भूल देण्यासाठी केसांसारख्या एका कॅथेटरद्वारे सर्विकल स्पेसमध्ये अॅनेस्थेशियाची औषधे देण्यात आली. यामुळे ऑपरेशनच्या प्रक्रियेसाठी छातीचा संपूर्ण भाग संवेदनाहीन झाला आणि रुग्ण जागृत, सजग आणि सर्वांना प्रतिसाद देत असताना संपूर्ण सीएबीजी प्रक्रियेमध्ये सर्व व्हाइटल्स स्थिर असताना ओपन हार्ट बायपास शस्त्रक्रिया पार पडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.