आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:विद्यापीठातर्फे उद्या  पीएच.डी.साठी मुलाखत

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी यूजीसीने नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर लागलीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या प्रक्रियेतच नव्या नियमांचा अंतर्भाव करुन त्यानुसार प्रक्रिया राबविली जात आहे. १० डिसेंबर रोजी इलेक्ट्राॅनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेशन सायन्स या विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे.

सकाळी ११.३० पासून मुलाखतींना सुरुवात होईल. इलेक्ट्रॅनिक्स सायन्सच्या १५ तर इन्स्ट्रुमेंटेशन सायन्सच्या तीन विद्यार्थ्यांच्या मुलाखती होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

त्यात पेट परीक्षा निकाल, सेट, नेट उत्तीर्ण प्रमाणपत्र, एम. फील. निकाल, पदव्युत्तर, पदवी प्रमाणपत्र, नाॅन क्रीमीलेअर आणि जातप्रमाणपत्र (आवश्यकता असल्यास) सोबत ठेवावे. विद्यार्थ्यांनी रिसर्च टाॅपीकच्या दोन काॅपी सोबत ठेवाव्यात, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागप्रमुखांकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...