आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:निमा विश्वस्तपदासाठी आजपासून मुलाखती; इच्छुकांमध्ये 40 उद्याेजक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या (निमा) विश्वस्तपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती साेमवार (दि. २) पासून सुरू हाेत आहेत. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात ४ जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस राेज दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मुलाखती हाेणार आहेत. साेमवारी १५ इच्छुकांच्या तर तीन दिवसांत ४० जणांच्या मुलाखती हाेतील. यात निमाच्या माजी अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांचांही समावेश आहे.

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने काही दिवसांपूर्वीच उद्याेजकांनी एकत्रित निर्णय घेऊन नावे निश्चित करण्याचे सांगितले हाेते. मात्र उद्याेजकांच्या तीन गटांचे एकमत झाले नाही. यानंतर उद्याेजकांच्याच मागणीनुसार मुदतवाढ दिली गेली हाेती, मात्र त्यातही एकमत न झाल्याने प्रक्रियेनुसार आता मुलाखतींतून निवड हाेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडीची ही प्रक्रिया सुरू हाेत असल्यामुळे लवकरच निमाचे कामकाज पुन्हा सुरू हाेण्याच्या अपेक्षा उद्याेजकांनी व्यक्त केल्या आहेत.

इच्छुकांकडून मुलाखतीची अशीही रंगीत तालिम निमामध्ये विश्वस्तपदी संधी मिळावी याकरीता आपापल्या नेत्यांच्या सांगाव्यानुसार काहींनी अर्ज दाखल केल्याची चर्चा हाेती. त्यामुळे मुलाखतीवेळी या इच्छुकांची तारांबळ उडू नये याकरीता एका गटाच्या नेत्याने इच्छुकांना निमा म्हणजे नेमके काय? याची माहीती पूर्णपणे असावी याकरीता सविस्तर माहितीपर मार्गदर्शन तसेच ते झाल्यावर मुलाखत कशी द्यायची याची रंगीत तालिमच शनिवारी सुटीच्या दिवशी करून घेतल्याची चर्चा औद्याेगिक वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

बातम्या आणखी आहेत...