आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक इंडइ्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन अर्थात निमा या जिल्ह्यातील साडेतीन हजार उद्याेजकांची संघटनेवर विश्वस्तपदी नियुक्तीसाठी साेमवारपासून मुलाखती सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी बाेलविण्यात आलेल्या १५ पैकी १२ इच्छुकांनी मुलाखत दिल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली असून आज मंगळवार आणि उद्या बुधवारीही ही प्रक्रिया राबविली जात आहे. दरम्यान उद्याेग वर्तुळात या मुलाखतींची चर्चा पहायला मिळत आहे.
धर्मदाय सहायक आयुक्त कार्यालयाकडून ‘निमा’ वर नियुक्तीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले हाेते, त्याला जवळपास दीड वर्षाचा कालावधी लाेटल्यानंतर मुलाखत प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाल्याने उद्याेजकांत समाधानाचे वातावरण आहे. निमाचे प्रदिर्घ काळ उद्याेजकांना अपेक्षीत असलेले कामकाज पुन्हा एकदा लवकरच सुरू हाेणार असल्याची आशा या मुलाखतींमुळे बळावली आहे. याचमुळे या मुलाखतींच्या माध्यमातून काेणाची निवड हाेते याकडे उदयाेजकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी १५ पैकी १२ इच्छुकांनी मुलाखत दिली असल्याची माहिती मिळते आहे.
निमाची माहीती, केलेले काम हे मुद्दे चर्चेत
इच्छुकांच्या मुलाखतीत नाव, गाव, पत्ता काय? या नियमित प्रश्नांसह निमाबद्दलची माहिती. निमावर भूषवलेली जबाबदारी, केलेले काम? याबाबतचे प्रश्न इच्छुकांना विचारले गेल्याची माहिती उद्याेगवर्तुळात चर्चिली जात आहे.
आज पुन्हा १५ इच्छुकांच्या मुलाखती
दरम्यान नियाेजनानुसार आज, मंगळवारी पुन्हा १५ इच्छुकांच्या मुलाखती हाेणार आहेत. तर उद्या बुधवारी १० इच्छुकांच्या मुलाखती नियाेजित आहेत. जे इच्छुक उपस्थित राहु शकले नाहीत, त्यांना पुन्हा मुलाखतीसाठी संधी दिली जाते का? याकडेही उद्याेजकांचे लक्ष लागून आहे.
निमाचे माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचाही समावेश
या चाळीस इच्छुकांमध्ये निमाचे माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे नेमकी निवड कोणाची होणार ?याकडे जिल्ह्यातील उद्योग वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.