आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:जिल्हा रुग्णालयातील शवागाराला असह्य यातना

जहीर शेख | नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील यंत्रणाच गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शवागारात हवा येण्यासाठी आणि दुर्गंधी बाहेर पडण्यासाठी येथील भिंतीमध्ये ठिकठिकाणी खड्डे केले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने या खड्ड्यांमध्ून माेठ्या प्रमाणात पाणी आत आल्याने आतमध्ये डबकेच साचले आहेत. तसेच हेच पाणी भिंतींमध्येही मुरले. काही ठिकाणी तर पाणी मृतदेहांवरही पाणी पडत असल्याने रुग्णालयासह बाजूलाच असलेल्या ठक्कर बाजार बसस्थानक आणि लगतच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाइक, परिसरातील दुकानदारांसह नागरिक प्रचंड हैराण झाले असून आराेग्यालाही धाेका निर्माण झाला आहे.

दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना तसेच, नातेवाइक अंत्यविधीसाठी येण्यास निश्चित कालावधी नसताना आणि अन्य काही कारणांमुळे मृतदेह शवागारात ठेवण्याचा पर्याय नातेवाईकांसमोर असतो. कोरोनाकाळात सिव्हिलमधील शवागारात मृतदेहांची संख्या क्षमतेपेक्षा चारपट झाली होती. त्याचा परिणाम शवागारातील वातानुकूलित यंत्रणेवर झाल्याने याठिकाणची ४८ शव ठेवणारी सर्व यंत्रणा बंद पडली. त्यातच दिवसाला ८ ते १० मृतदेह रोज आणले जातात. मात्र,जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत या शवागारात रोज १५ मृतांचे विच्छेदन केले जाते. बहूतेकवेळा बेवारस मृतदेह दोन ते तीन दिवस याच ठिकाणी ठेवले जातात. या विभागातील यंत्रणा नेहमीच बंद पडते, यावर उपाययोजना करण्याऐवजी तसेच, नवीन यत्रणा बसविण्याऐवजी शवागारातील भिंतीला खड्डे करुन त्यातून हवा येण्यासाठी व दुर्गंधी बाहेर काढण्यासाठी मार्ग करण्यात आला. मात्र, हा मार्ग आता पावसाचे पाणी थेट मृतदेहांवर येण्याचा मार्ग झाला आहे. या खड्ड्यांमुळे सपूर्ण शवागारात पाण्याचे डबके साचत आहे. मागील वर्षभरापासून या विभागातील सर्वच वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने मृतदेहाची दुर्गंधी संपूर्ण रुग्णालयात पसरत आहे. त्यामुळे या विभागाचे काम करणारे कर्मचारी तसेच शवविच्छेदनासाठी बाहेर ताटकळत उभे असलेले मृतांचे नातेवाईक यांना ही असह्य दुर्गंध सहन करावी लागत लागते आहे.

मृतदेह दीर्घकाळ पडून; परिसरात प्रचंड दुर्गंधी
सिव्हिलच्या शवागारात १५ वर्षापूर्वी बसविण्यात आलेल्या १२ यंत्रांमध्ये ४८ मृतदेह ठेवले जातात. मात्र, मागील काही वर्षापासून या ठिकाणाच्या यंत्रणा बंद पडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून तसेच, मागील वर्षभरापासून सर्वच यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास ३० वर बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र,अनेक मृतदेह दीर्घकाळापासून पडून आहे. त्याची प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

आधी उन्हाळ्यात आता पावसाळ्यात अडचण
वर्षभरापूर्वी शवागारातील यंत्रणा बंद पडल्यानंतर रुग्णालय‍ाकडून मनपासह पोलिसांना माहिती देवून बेवारस मृतदेहांचे विल्हेवाट लावण्याची विनंती केली होती. काही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली तर काही अद्याप येथेच आहेत. उन्हाळ्यात मृतदेहांची प्रचंड दुर्गंधी येत होती. यामुळे याठिकाणी भिंतीवर मोठे खड्डे केले गेले. पावसामुळे आता याच खड्ड्यांतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून त्याचा मृतदेहांवर आणखीच परिणाम हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...