आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा रंगकर्मींचा सहभाग:दर्शक रंगभूमी कार्यशाळेत थिएटर ऑफ दि ऑपरेस्ट या नाट्यप्रकाराची ओळख

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात प्रथमच इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन(इप्टा) आणि थिएटर वर्कर्सच्या वतीने “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ट” ची “दर्शक रंगभूमी’ ही कार्यशाळा केटीएचएम महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात घेण्यात आली. कार्यशाळेत नाशिकच्या २० युवा रंगकर्मी सहभागी होते. कार्यशाळेत नाशिक मधील नाट्यरसिक युवकांना “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ट” या नाट्यप्रकाराची ओळख झाली.

आदिम काळात नट आणि प्रेक्षक ही दरी नव्हती. नाटक हे लोकांनी लोकांसाठी केलेली कृती असे. याच गोष्टीच्या मुळाशी जाऊन “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ड” या नाट्यप्रकाराची निर्मिती झाली. ब्राझिलियन नाटककार आगस्टो बोअलने “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ड” या नाट्य प्रकाराची निर्मिती केली. ऑपरेस्ट म्हणजे शोषित अर्थातच शोषितांची ही रंगभूमी समाजातील समस्या आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींनवर त्यांना स्वतः बोलण्याची संधी देत असते अथवा चर्चा करण्यास भाग पाडत असते, असा सूर या कार्यशाळेत उमटला.

कार्यशाळा थिएटर वर्कर्सच्या प्रियपल दशांती आणि संकेत सीमा विश्वास यांनी घेतली. दोघेही नाट्य व सिनेकलावंत असून आधीच ते टीव्ही मालिकेमधून घराघरात पोहाेचलेले कलाकार आहेत. इप्टा नाशिकच्या तल्हा शेख, हर्षाली देवरे, कृष्णा कांगणे यांनी विशेष साहाय्य केले.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे तेजस बिलदीकर व इतर शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी विशेष मदत घेतली.कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी रंगकर्मींनी नाट्य प्रयोग सादर केले.

बातम्या आणखी आहेत...