आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशयाेजना:‘चांदणी’तून युवा शेतकऱ्याची घुसमट

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंचावर शेती उभी करणे आणि त्यातही माची उभी करून नाटक त्या माचीवर सादर करणे हे अवघड काम ‘चांदणी’ या नाटकाच्या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी चांगले पेलले. उत्तम नेपथ्य, त्याला साजेशी प्रकाशयाेजना आणि चांगल्या अभिनयामुळे नाटक नक्कीच चर्चेत राहणार आहे.

६१व्या महाराष्ट्र राज्य हाैशी नाट्य स्पर्धेत साेमवारी (दि. २१) प. सा. नाट्यगृहात संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने राेहित पगारे लिखित, दिग्दर्शित ‘चांदणी’ हे दाेन अंकी नाटक सादर केले. आतापर्यंत झालेल्या नाटकांमध्ये हे नाटक नक्कीच उजवे ठरले असे म्हणायला हरकत नाही. या नाटकातून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि परंपरेने पुढची पिढीही शेतीतच आेढली जाते आणि त्यांनाही त्याच संघर्षाला सामाेरे जावे लागते, या घुसमटीत अडकलेल्या तरुणाची गाेष्ट म्हणजे ‘चांदणी’ हे नाटक आहे. नाटकातील तीनही मुख्य कलाकारांचा अभिनय दाद घेऊन जात हाेता. त्यातही बापाच्या भूमिकेतील दिलीप काळे यांच्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांना जिंकले हाेते. तर मुलाच्या भूमिकेतील भरत कुलकर्णीही विशेष छाप टाकत हाेते. आईच्या भूमिकेतील अनुजा देवरे यांचाही चांगला प्रयत्न हाेता. नाटकाच्या तांत्रिक बाजू भक्कम हाेत्या. नेपथ्यात शेतात माची उभी करून त्यावरच संवाद हाेते. पण, कुठेही एकाच ठिकाणी सगळे सुरू आहे याची जाणीव हाेत नव्हती. तर प्रकाशयाेजनाही साजेशी हाेती. संगीतात आणखी वाव हाेता. नाटकाची रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मिलिंद साळवे, नेपथ्य भूषण गायकवाड यांचे हाेते.

एका शेतकऱ्याच्या मुलाला या सर्व परिस्थितीचा आणि बापाच्या स्वभावाचा आलेला वैताग आणि बापानेच आपल्याला शेतीत लाेटून आपले आयुष्य बरबाद केल्याची त्याची झालेली भावना, संकटातही बाप त्याला शेतीच्या काेणत्या तरी कामात व्यग्र ठेवताे. जेणेकरुन ताे नैराश्येत जाणार नाही आणि आत्महत्या करणार नाही. बाप-मुलाच्या या संघर्षात आई महत्त्वाची भूमिका पार पाडते. असा नाटकाचा आशय आहे.

बातम्या आणखी आहेत...