आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला सादर:पोदार शाळेचे स्नेहसंमेलनात‎ विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार‎

नाशिक‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तपाेवन लिंकराेड येथील पोदार‎ इंटरनॅशनल स्कूलच्या दाेन दिवसीय‎ वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी‎ विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या‎ कलागुणांचा आविष्कार केला. सकाळ‎ सत्रात स्नेहसंमेलन तर दुपार सत्रात ‘बी द‎ चेंज’ या विषयावर कार्यक्रम सादर‎ करण्यात आले.‎ प्राचार्य डॉ. मनोहर महाजन आणि‎ उपप्राचार्या तनुश्री मित्रा यांनी प्रमुख‎ अतिथी ज्येष्ठ दिग्दर्शक सुरेश गायधनी,‎ वरिष्ठ व्सरव्यवस्थापक समीर वागळे,‎ माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे,‎ प्राचार्य अविनाश लोहार, प्राचार्य जसिंथा‎ परके, प्राचार्य मोमिता चौधरी, जयेश‎ चव्हाण यांचे स्वागत केले.‎

दुपारच्या सत्रात प्रमुख अतिथी जय‎ शुक्ल, प्राचार्य नीलेश पाटील, प्राचार्य‎ भविषा हिराणी, माजी नगरसेवक राहुल‎ दिवे आदी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते‎ दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुंदर‎ नृत्य आणि नाटिकेच्या सादरीकरणाने‎ सर्वांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाच्या‎ सौंदर्यात भर घालण्याचे काम बालगायक‎ आणि वाद्यवृंद गट होता त्यांनी केवळ‎ त्यांच्या मधुर स्वरांनीच नव्हे तर तालबद्ध‎ कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.‎ करणारे विद्यार्थी, इयत्ता दहावी उत्तीर्ण‎ विद्यार्थी, वाहतूक कर्मचारी या सर्वांचा‎ सत्कार करण्यात आला. आभारप्रदर्शन‎ आयुषी भदाणे आणि इन्सिया मर्चंट यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...