आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंशोधनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०२२’ या स्पर्धेची प्राथमिक निवड चाचणी पार पडली. त्यात मानव्यविद्या भाषा, ललितकला वाणिज्य, व्यवस्थापन विधी, विज्ञान शेती, पशुसंवर्धन अभियांत्रिकी तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण ५२ महाविद्यालयातील २८२ विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. पदवीपूर्व (यूजी)चे १५२, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे १०२, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी.) व शिक्षक(टिचर)चे २८ स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धकांनी संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले.
निवड चाचणी स्पर्धेला सोमवारी (दि. १९) सुरुवात झाली. त्यात सर्व सहभागी स्पर्धकांनी आप-आपली संशोधने आणि आयडियांचे प्रदर्शन मांडले होते. परीक्षकांनी त्याचे परीक्षण केले. सहभागींची परीक्षकांकडून मुलाखतही घेण्यात आली. सहभागींद्वारे पीपीटीद्वारे सादरीकरण करून आपापल्या संशोधनाचे असलेले महत्त्व उपस्थितांसमोर सादरीकरणातून विशद करण्यात आले. निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, संशोधनाकडे केवळ स्पर्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता समाजाची गरज लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे संशोधन करावे.
कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्हणाले, विद्यापीठांच्या कुलपतींच्या प्रेरणेने ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प महोत्सव सुरू करण्यात आला आहे. परीक्षकांनी नवोदित संशोधकांचे सर्वसामान्यांना आरोग्याविषयी उपयुक्त ठरणाऱ्या चांगल्या प्रकारच्या शोध प्रकल्पाची निवड करावी. परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डॉ. मनोजकुमार मोरे, परीक्षक डॉ. सुवर्णा गणवीर, डॉ. प्रीती बजाज, डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. राजेश वानखेडे आदी उपस्थित हाेते.
आधुनिक प्रगत ज्ञानाशी सांगड घालून संशोधन गरजेचे जागतिक स्तरावर संशोधनाचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक प्रगत ज्ञानाशी सांगड घालून संशोधन करणे गरजेचे आहे. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कारची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धेतील सहभाग ठराविक क्षेत्रापर्यंत मर्यादित नसून विद्यार्थ्यांसमवेत संवाद होणे गजचेचे आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या संशोधन विषयक उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यावेळी केले.
महाविद्यालयांनी या विषयांवर केले प्रकल्पांचे सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रासायनिक शेतीचे फायदे, आयुर्वेद उपचार पद्धती, पशुसंवर्धनातून राेजगार, नव्याने आलेली आधुनिक उपचार पद्धती व तिचे स्वरूप असे विविध प्रकल्प सादर केले. विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहा संवर्गांचा समावेश आहे. प्रत्येक संवर्गातून तीन अशा १८ स्पर्धकांची निवड केली जाईल. त्यातून उत्कृष्ट संशोधनेही आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवडले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.