आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Investment Opportunities In Maharashtra And America; Consul General Randhir Jaiswal's Confidence In The Maharashtra Chamber's Conference| Marathi News

व्यापार परिषदेचे आयोजन:महाराष्ट्र अन् अमेरिकेत गुंतवणुकीच्या संधी; महाराष्ट्र चेंबरच्या परिषदेत कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांचा विश्वास

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश असून जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने अमेरीकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे ते पाहता महाराष्ट्र व अमेरिकेत गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील, असा विश्वास भारताचे न्युयॉर्कमधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरीका यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील अटलांटीक सिटी, न्यु जर्सी येथे बिझनेस समीटचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी जायस्वाल बोलत होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी, बिझनेस समीटचे निमंत्रक आनंद चौथाई, नारीशक्ती पुरस्कार विजेत्या रूमादेवी, पर्सिस्टंट कंपनीचे प्रमुख आनंद देशपांडे, विकास बावधनकर, नरेन गोडसे, नवीन पाठक, चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी व्यासपीठावर उपस्थित होते. िझनेस समीटचे निमंत्रक आनंद चौथाई यांनी आयोजन यशस्वी केले याचा अमेरीकेतील महाराष्ट्रीयन समुहास अभिमान आहे, असे सांगितले.चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी महाराष्ट्राचे विभागवार सादरीकरण केले. पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे, श्रीमती रूमादेवी यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या. कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी प्रस्तावांच्या स्विकृतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...