आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषभनाथ भगवंत महामस्तकाभिषेक:नाशिकमधील मांगीतुंगी येथील कार्यक्रमासाठी राज्यपालांना निमंत्रण, 15 जूनला सोहळा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधील मांगीतुंगी येथे गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजींच्या आशीर्वादाने स्थापित जगातली सर्वात उंच जैन मूर्ती असलेली श्री ऋषभनाथ भगवंताच्या मूर्तीचा दर 6 वर्षांनी महामस्तकाभिषेक सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी 15 ते 30 जून रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 2016 मध्ये पहिल्यांदाच हा अभिषेक सोहळा झाला होता.

राज्यपालांना निमंत्रण

कार्यक्रमास देशभरातील जैन बांधव लाखोच्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे. सहा वर्षानंतर होणार्‍या या भव्य सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांना उपस्थित राहण्यासाठी श्री. भ. ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटीतर्फे राजभवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले.

सकारात्मक प्रतिसाद

राज्यपाल महोदयांनी या मूर्तीबद्दल तसेच कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती घेतली. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी वाशिम, भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमेटी व महामस्तकाभिषेक महोत्सवाचे महामंत्री संजय पापड़ीवाल, महोत्सवाचे मंत्री भूषण कासलीवाल चांदवड, डॉ. जीवनप्रकाश जैन,चंद्रशेखर कासलीवाल - चांदवड, राजेंद्र कासलीवाल - मालेगाव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...