आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्मी ठाकरेंची अनोंदणीकृत कंपनीत भागीदारी:किरीट सोमय्यांनी ठाकरे कुटुंबाला पुन्हा घेरले, चौकशीची केली मागणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आमदारांचा घाेडेबाजार सुरु असल्याची टिका केली जात आहे. मात्र, आमदारांना घाेडे म्हणण्याचे काम फक्त गाढवच करु शकताे, अशी खरमरीत टिका भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केली आहे. तसेच, 'श्रीजी' हाेम या प्रकल्पात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी आहे. मात्र, ही कंपनी नोंदणीकृत नाही. त्यामुळे या कंपनीची चाैकशी व्हावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत साेमय्यांनी केली.

किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदारांच्या घाेडेबाजाराबाबत निवडणूक आयाेगाला माहीती देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच याबाबत निवडणूक आयाेगाने मुख्यमंत्री व सामनाच्या संपादकांचा जबाब नोंदवावा व कारवाई करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली.

तसेच, शिवाजी पार्क येथे उभी असलेली श्रीजी हाेम इमारत काेणाची आहे? याबाबतचे सर्व कागदपत्रे ईडीकडे दिले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटकणकर, राहूल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी हाेम्स बनवल्याचा आरोपही यावेळी सोमय्यांनी केला. पत्रकार परिषदेस आमदार राहूल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रवक्ते लक्ष्मण सावजी आदी उपस्थित हाेते.

भाजप कार्यालयाबाहेर माेठा बंदाेबस्त

किरीट साेमय्या यांची पत्रकार परिषद झाली त्या भाजप कार्यालयाबाहेर माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. तसेच पक्ष कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडींगदेखील करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...