आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:इरफान खानला श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांनी गावाचे नाव इरफानला केले समर्पित

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पत्राचा वाडा या गावात दिवंगत अभिनेता इरफान खान यांचे फार्म हाऊस आहे - Divya Marathi
पत्राचा वाडा या गावात दिवंगत अभिनेता इरफान खान यांचे फार्म हाऊस आहे
  • या गावात इरफानचे फार्म हाउस आहे, त्यांने अनेकदा येथील शेतकरी व मुलांना मदत केली होती
  • पत्राचा वाडा असे या गाण्याचे नाव होते, आता ते 'हिरो ची वाडी' असे बदलण्यात आले

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकच्या इगतपुरीतील एका गावातील लोकांनी आपल्या गावाचे नाव इरफानला समर्पित केले. या गावात इरफानचे फार्म हाउस आहे. या गावाचे पत्राच्‍या वाडा होते, आता ते बदलून गावातील लोकांनी 'हीरो ची वाडी' केले आहे. कर्करोगाशी झुंज देणार्‍या या अभिनेत्याचे 29 एप्रिल रोजी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते.

इरफान खान कुटुंबासमवेत बर्‍याचदा इथे आला होता

त्रिलंगवाडी किल्ल्याजवळ स्थित पत्राच्या वाडा गावासोबत इरफान खानच्या जीवनातील बऱ्याच सुंदर आठवणी जोडल्या आहेत. ते बर्‍याचदा कुटुंबासमवेत येथे आले आहेत. इरफानने अनेक प्रसंगी गावातील लोकांना मदत केली. मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी त्यांनी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. 

तब्येत खराब असूनही, गावातील लोकांना केली मदत

इरफानने जेव्हा या गावात प्लॉट विकत घेतला तेव्हाच गावातील लोक आपल्या गावाचे नाव बदलण्याबद्दल बोलू लागले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार इरफान अनेकदा इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, रेनकोट, स्वेटर यासारख्या वस्तू दान करत होता. इतकेच नाही तर इरफान अमेरिकेत त्याच्या कर्करोगाचा उपचार घेत होता, तेव्हा त्याने नातेवाईला पाठवून येथील मुलांची मदत केली होती. 

बातम्या आणखी आहेत...