आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकची सर्वांगीण प्रगती होण्याच्या ध्यासाने प्रेरित झालेल्या 26 विविध व्यावसायिक व सामाजिक संस्थांमधील 88 हून अधिक नामवंत नाशिककराचा समावेश असलेल्या अराजकीय चळवळ 'मी नाशिककर' ने उद्योगस्नेही धोरण, नाशिकचा विकास टुरिझम व्हॅली म्हणून होण्यासह योग विद्यापीठ पाठपूरावा याकरीता आग्रही भूमिका घेतली आहे.
विभागीय बैठक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या अनुषंगाने मागण्या करण्यात आल्या. गमे यांनीही त्याला सकारात्मकता दर्शवित उद्योजकांसाठी एक खिडकी योजना, नाशिक विमानतळाचे उत्तर महाराष्ट्राचे विमानतळ म्हणून ब्रॅण्डींग करण्याचे आश्वासन दिले. पियुष सोमाणी, उमेश वानखेडे, संजय कोठेकर, किरण चव्हाण व मनीष रावल या विविध क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आहे.. आजपर्यंत ‘मी नाशिककर’ चळवळ इंडस्ट्री, आय. टी. व ट्रेड या त्रिसूत्रीवर काम करत असून मोठे उद्योग नाशिक मध्ये यावेत तसेच इन्फ्रास्ट्रक्चर, दळणवळण, कृषी प्रक्रिया उद्योग, वाईनरी, मेडिकल टुरिझम या बाबींसाठी विविध स्तरांवर पाठपुरवठा करत आहे. त्यांच्यासाेबतच अशोक कटारिया, अनंत राजेगावकर, विलास शिंदे, डॉ. राज नगरकर, सुधीर मुतालिक, संजय पैठणकर, संतोष मंडलेच्या, आर्किटेक्ट. विवेक जायखेडकर , आर्किटेक्ट. धनंजय शिंदे, एच् ए एल प्रतिनिधी यात असून संजय कोठेकर हे सीईओ आणि समन्वयक म्हणून काम बघत आहेत. नाशिकच्या विकासासंबंधीत विषयावर झालेल्या या चर्चेत शासकिय जमीनींची माहीती एका ठिकाणी मिळावी याकरीता सिंगल विंडाे उपलब्ध करून देणे तसेच नाशिक विमानतळाचे उत्तर महाराष्ट्राकरीताचे विमानतळ म्हणून ब्रॅण्डींग व्हावे याकरीता तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन गमे यांनी यावेळी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.