आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दुकान भेटीपूर्वी कार्यालयास माहिती देणे अनिवार्य; दुकानदारांना दिलासा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैधमापन सहनियंत्रकांकडून दुकानदारांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी या विभागाच्या नियंत्रक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असून आता सहनियंत्रकांना आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याची माहिती सहनियंत्रक कार्यालयास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी हे आदेश दिले.

या ​​​आदेशानुसार, विभागीय सहनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी भेटीचा उद्देश आणि माहिती सहनियंत्रक कार्यालयास आगाऊ देण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २०१९ मध्ये दिले आहेत. तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीही काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन त्यांना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या तक्रारींची दखल घेत नाहक त्रास देण्याच्या हेतूने भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सहनियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहिती दिली आहे की नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी राज्यातील आस्थापना, दुकानदार, व्यापारी यांनी ०२२-२२६२१९६८ या क्रमांकावर संपर्क साधून खातरजमा करावी, असे आवाहन नियंत्रक वैधमापकशास्त्र डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे. या आदेशामुळे दुकानदारांना आता दिलासा मिळणार असून तक्रारही करता येणार आहे.

वैधमापन कार्यालयाचे विभागनिहाय संपर्क क्रमांक
मुंबई महानगर विभाग - ०२२ - २४१४८४८४, कोकण विभाग - ठाणे, पालघर, रायगड, सिंधूदुर्ग जिल्हा ०२२ - २७७५७४०७४, पुणे विभाग - सातारा, पुणे, कोल्हापुर, सांगली, सोलापूर जिल्हा - ०२०-२६६९७२३२ नाशिक विभाग - नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव - ०२५३- २४५५६९६ अौरंगाबाद विभाग - औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड- ०२४०- २९५२६५६, अमरावती विभाग - अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशिम- ०७२१-२९९००३८, नागपूर विभाग - नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया - ०७१२- २५४०२९२.

बातम्या आणखी आहेत...