आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर त्यांच्यामध्ये प्रभावी बदल होणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवातून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. नवसमाजाची निर्मिती करीत आहोत ही जाणीव ज्ञानदानात असली पाहीजे. प्रभावी ज्ञानसंस्कारातून विद्यार्थ्यांच्या मनावर मानवी मूल्यांचे संस्कार होणे गरजेचे आहे, असे मत मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.
अॅड. नामदेवराव माधवराव ठाकरे वाणिज्य, व्यवस्थापन व संगणकशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत निर्भयकन्या अभियान, विद्यार्थी सुरक्षा विमा योजना, रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजना, कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना, स्वच्छ आणि समर्थ भारत अभियान, आपत्कालीन योजना, विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास योजना या उपक्रमांचे उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अॅड. ठाकरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्त्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र रचना विकसित करण्यात आली आहे. या शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, शिक्षकांनी समजावून घेणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर मानवी मूल्यांचेही संस्कार होतील, अशा योजना महाविद्यालयात कार्यान्वित होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्राचार्य डॉ. रवींद्रकुमार पाटील यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
व्यासपीठावर संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, अॅड. लक्ष्मण लांडगे, अमित बोरसे, शिवाजी गडाख, डॉ. अजित मोरे, प्रा. मेधा सायखेडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप रायते यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विभावरी पाटील यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.