आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशकातील ज्ञानदीप आश्रमात आणखी एका मुलीवर २०१९ मध्ये मुलीवर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. संशयित २०११ पासून आश्रम चालवत असून त्याच्या आश्रमात जेवढ्या मुली आल्या या सर्व मुलींचे जबाब घेतले जाणार असून पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आजपर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात ६ आणि सटाणा पोलिस ठाण्यात १ असे ७ गुन्हे संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे ऊर्फ सोनू याच्याविरोधात दाखल झाले आहेत. पोलिसांनी आश्रम सील केला आहे पीडित मुलींसह १३ मुलींची व्यवस्था निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. २०१८ मध्ये आश्रमात असलेल्या १४ वर्षीय मुलीला हाक मारून संशयिताने खोलीत बोलवून घेतले. हातपाय दाबून देण्याचा बहाणा करत मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिअो सुरू करत मुलीवर अतिप्रसंग केला. मुलीने नकार दिला तर संशयिताने ‘तुला आश्रमातून काढून टाकेन, तुझ्यासह तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन’ अशी धमकी देत मुलीवर अत्याचार केला.
आश्रम बेकायदेशीर संशयित मोरे २०११ पासून बेकायदेशीर आदिवासी मुलांसाठी आश्रम सुरू करत येथे गरीब मुलींच्या पालकांना आमिष देत मुलींना घेऊन येत होता. पाचवीनंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींना तो आश्रमात ठेवत होता. आदिवासी विकास विभागाची परवानगी न घेता आश्रम सुरू केला. शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा विभागाकडून दाखल करण्यात येणार आहे.
२०११ पासून प्रवेशित मुलींचा घेणार जबाब ^संशयित आश्रमात २०११ पासून किती मुली होत्या या सर्व मुलींची माहिती घेतली जात आहे. या मुलींचे महिला व बाल कल्याण विभाग आणि पोलिसांकडून जबाब घेतले जाणार आहेत. - किरणकुमार चव्हाण, उपायुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.