आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाणे शहराचा विकास करण्यासाठी मी ११ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. नाशिकलाही मी तसा निधी देताे. असे सूताेवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच गटात सामील झालेल्या या अकरा माजी नगरसेवकांनी नाशिकच्या विकासासाठी सविस्तर आराखडा तयार करावा. तळागाळातील लोकांपासून प्रत्येक क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधावा, अशा सूचनाही केल्याचे एका माजी नगरसेवकाने सांगितले. यामुळे मात्र यापूर्वी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते, आता शिंदे यांनी नाशिककडे चांगलेच लक्ष केंद्रित केल्याने शहराला नवे दत्तक पालक मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पक्षांतर्गत वाढत्या कुरबुरीचे कारण देत माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली ११ नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.१५) मध्यरात्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विधानसभेचे नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी हा प्रवेश केल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आणि धर्मवीर आनंद दिघे त्यांचे विचार पोहोचविण्याची जबाबदारी सगळ्यांची असल्याचे मुख्यमंत्री पक्ष प्रवेश करताना म्हणाल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले.
सहा विभागात कार्यालय; प्रत्येक नागरिकाची समस्या सुटणार शहरातील सहाही विभागांमध्ये पक्षाची कार्यालये सुरू होतील. या ठिकाणी जन्ममृत्यू दाखला, रेशन कार्डपासून तर अत्यावश्यक कागदपत्रे सुलभरीत्या लोकांना कशी मिळतील या दृष्टिकोनामधून मदत केंद्र सुरू होतील, अशी माहिती बोरस्ते यांनी दिली.
संगीता जाधव यांचा शुक्रवारी सकाळी प्रवेश सिडकोतील एक माजी नगरसेवक प्रवेशापूर्वीच मुंबईतून परतला. स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव व संगीता जाधव यांनी सकाळी मुंबईमध्ये दाखल होत ऐनवेळी प्रवेश केला.
यांनी केला पक्षप्रवेश महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, पूनम मोगरे, प्रताप मेहरोलीया, ज्योती खोले,, जयश्री खर्जूल, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, राजू लवटे यांच्यासह सूर्यकांत लवटे, मनसेचे समन्वयक सचिन भोसले यांनी प्रवेश केला. डी. जे. सूर्यवंशी तसेच भागवत आरोटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरेंच्याच गटात असल्याचे स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.