आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:संभाजीराजे तलवारींचा वापर ओबीसी अथवा कुणावर करतात ते बघावे लागेल - छगन भुजबळ

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरक्षणप्रश्नी राजकारण नको : छगन भुजबळ

विजय वडेट्टीवार म्हणाले ते खरं आहे की राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. एका समाजाची बाजू घेतल्यास इतर समाजावर अन्याय होता कामा नये. पण, आता संभाजीराजे तलवारी उपसण्याबाबत बोलतात. तर ते तलवारींचा वापर ओबीसीवर, आदिवासींवर की आणखी कुणावर करतात ते बघावे लागेल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अन् अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींना लगावला. तसेच राज्यातील वातावरण बिघडणार नाही यासाठी तलवारींची नाही तर शब्दांची खणाखणी थांबवली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणावरून आमचा संयम तोडायला लावू नका अन्यथा आम्ही तलवारीसुद्धा हातात घेऊ, असा इशारा खासदार संभाजीराजेंनी सरकारला दिला. तर मंत्री विजय वडेट्टीवार व संभाजीराजे दोघांमध्ये कलगीतुरा रंगला असताना आता भुजबळांनीही त्यात उडी घेतली. भुजबळ म्हणाले, मराठा, ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला हवी. आता चर्चा बरीच झाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser