आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 तासांतच घटनेचा उलगडा:काकानेच केला पुतण्याचा वायरने गळा आवळून खून

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी पाेलिसांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. काकाने पुतण्याचा चार्जर वायरने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मंगळवारी (दि. १) दुपारी संतू वसंत वायकंडे यांचा मृतदेह घरात आढळून आला होता. पत्नीच्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने संशयित निवृत्ती हरी कोरडे (वय ५९) रा. इंदोरे दिंडोरी यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि लता वायकंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी ११ वाजता त्यांचे पती संतू वायकंडे (३८) हे घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांना सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असता तपासून मृत घोषित करण्यात आले. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने खाेलवर तपास केला असता मयताचा काका संशयित निवृत्ती कोरडे शेतातील घेवडी विक्री करण्यास आला होता.

घरी जाण्यास उशीर झाल्याने तो संतू वायकंडे यांच्या घरी झोपला वायकंडे यांच्या पत्नी, मुले दिवाळीनिमित्त गावी गेले असल्याने दोघे मद्य प्यायले. वायकंडे यांनी दोन महिन्यांपूर्वी कोरडे यांचेकडून दाेन हजार रुपये घेतले होते. पैशांची मागणी केली असता दोघांमध्ये वाद झाले. रात्री वायकंडे झोपल्यानंतर संशयिताने वायरने गळा आवळून खून केला. सकाळी ताे फरार झाला होता. पथकाने माग काढत त्याला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक डाॅ.सीताराम कोल्हे, युवराज पत्की यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...