आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालयाच्या (आयटीआय) वतीने राज्यभर सुरू असलेल्या प्रवेशाची पहिला फेरी पूर्ण झाली. पहिल्याच फेरीत नाशिकमध्ये ८ हजार १६५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. गेल्या वर्षापेक्षा यंदा १५ टक्के जास्त विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत प्रवेश मिळाला.
पारंपरिक शाखांपेक्षा काैशल्य मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. १० वी नंतर आयटीआयच्या विविध ट्रेडला थेट प्रवेश मिळत असल्याने विद्यार्थ्यांची नाेंदणी वाढली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांना अर्ज केले आहेत. नाशिकच्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी ८७ टक्क्यांपर्यंत गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या अन् तिसऱ्या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागेल.
इलेक्ट्रिक ट्रेडला पसंती
नाशिक आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, मोटर व्हेइकल मेकॅनिक आणि वायरमन या तीन कोर्सला विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती देण्यात आली. पहिल्याच फेरीत ४८ पैकी ३० जागा भरल्या. मोटर मेकॅनिकच्या ३८ पैकी ३३ तर वायरमनच्या ४८ पैकी २४ जागांचे प्रवेश निश्चित झाले.
८४ टक्क्यांचा कटऑफ
सातपूर आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक आणि वायरमन या तीन ट्रेंडचा ८४ टक्क्यांचाच कटऑफ लागला. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन ट्रेडला
पसंती नोंदवली.
आयटीआयकडे ओढा
आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यंदा आयएमसीचे २६ प्रवेश नाशिकमध्ये झाले असून एकूण २५९ जागा आहेत. ज्यांना पहिल्या तीन फेऱ्यांत प्रवेश मिळणार नाही अशांचे यातून प्रवेश हाेतील. - राजेश मानकर, प्राचार्य, सातपूर आयटीआय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.