आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय विद्यार्थी:आयटीआय प्रवेश; चाैथी फेरी 26 ऑगस्टपर्यंत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटीआयला विद्यार्थी, युवकांकडून अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र प्रवेशप्रक्रियेतून दिसून येत आहे. सातपूर आयटीआयमध्ये ७५९ जागांवरील प्रवेश तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण झाले आहेत. आता चाैथी फेरी सुरू असून त्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मुळ कागदपत्रांसह थेट संस्थेत सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन आयटीआयच्या प्राचार्यांकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा कल काैशल्याधीष्ठित अभ्यासक्रमांकडे अधिक असून उद्योगांकडूनही कुशल व्यक्तींची मागणी अधिक आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकांतून मिळणाऱ्या शिक्षणाकडे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा अधिक कल आहे. आयटीआयच्या पहिल्या तीन फेऱ्या संपल्या आहेत. सातपूर आयटीआयमध्ये ७५९ प्रवेश झाले असून, आयएमसीच्या ९० जागा तर नियमित ६६९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित ३४४ जागा असून, त्यात १६९ आयएमसी म्हणजे व्यवस्थापनाच्या जागा आहेत. तर १७५ नियमित जागा असून विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन आयटीआयचे गटनिदेशक प्रशांत बडगुजर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...