आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य आयटीआय निदेशक संघटनेने निदेशकांच्या प्रलंबित मागण्यांविषयी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन पुकारलेले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी नाशिक शहरातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय आयटीआय मध्ये कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील निदेशक संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीने केलेल्या आवाहनानुसार सर्व शाखांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. वेतनेत्तर अनुदान, बदली, भत्त्यासह प्रलंबित मागण्या मान्य करण्याकरता शासन व प्रशासनाकडे आंदोलनाच्या माध्यमातून आग्रही पवित्रा घेतला.
सर्व आयटीआयमधील निदेशकांनी आक्रमकरीत्या प्रलंबित मागण्यासाठी काळी फीत लावून कामकाज केले. तसेच, दुपारी भाेजनाच्या सुट्टीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच निदर्शने केली. या एकदिवशीय लक्षवेधी आंदोलनाने जर निदेशकांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा विभागीय अध्यक्ष एस.के. मंडलिक, सचिव एस.एन. बोराडे, सहसचिव जे.व्ही. देसाई, उज्ज्वल इंगळे, जे. डी. पाटील, भाऊसाहेब थोरात, अरविंद पाटील, नितीन चौधरी, दिलीप देसले, प्रमोद पाटील, गिरीश पाटील आदी सहभागी झाले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.