आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे भरती:आयटीआय इन्स्ट्रक्टर, रेल्वे भरती एकाचवेळी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयटीआय इन्स्ट्रक्टर पदासाठी २८ आणि २९ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. १४५७ पदांसाठी परीक्षा होणार असून मोठ्या संख्येने उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. याच दिवशी रेल्वे भरती ‘गट ड’ परीक्षा नियोजित असल्याने दोन्ही परीक्षांचे अर्ज भरलेले उमेदवार गाेंधळात सापडले आहे.

आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा ८ ऑक्टोबरनंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. रेल्वे भरती ‘गट ड’ परीक्षा २०१९ ही आधीच नियोजित केली होती. त्यानुसार राज्यात २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान ही परीक्षा घेतली जात आहे. तर ८ ऑक्टोबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त ‘गट ब’ परीक्षा आहे. त्यामुळे आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा पुढे ढकलल्यास उमेदवारांना इतर परीक्षांना प्रविष्ट होता येईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने राज्य सरकारकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...