आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १७ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. यंदा शहरातील सातपूर येथिल शासकीय आयटीआयमध्ये १ हजार ३३२ जागांवर प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी आयटीआयकडून कौशलदूत समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सातपूर आयटीआयचे प्राचार्य राजेश मानकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे दरवर्षी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. यावर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. नाशिकमधील सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २३ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या १३३२ जागांसाठी तर त्र्यंबकनाका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे ११ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहे. एकूण चार फेऱ्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.
सर्व आयटीआयमध्ये अर्ज स्वीकृती केंद्र असून या केंद्रावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती व निश्चिती करू शकतील. प्रवेशाचा तपशील माहितीपुस्तिका संकेतस्थळावर डाऊनलोड सेक्शनमध्ये आहे. प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावा. माध्यमिक शाळेत व्यवसाय शिक्षण हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व प्रवेशप्रक्रिया admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर होत आहे.
शासनाची मान्यता अथवा पूर्वपरवानगी नसलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ऑफलाइन प्रवेशप्रक्रिया राबवित आहेत. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी प्रवेश घेत असलेली सदर संस्था admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची खात्री करून ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातूनच प्रवेश घ्यावे, अशा सूचनाही नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यावेळी राजेश मानकर, एस. सी. राठोड, एम. के. तेलंगी, प्रशांत बडगुजर आदी उपस्थित होते.
‘गुगल मिट’द्वारे मार्गदर्शन
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर, नजीकच्या संस्थेत बुधवार(दि.२२)पासून प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येणार आहे. गुरुवार(दि.२३) सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत https://meet.google.com/mxu-djet-efe व दुपारी ३ ते ४ https://meet.google.com/xav-djov-dkk या गुगल मिट लिंकवर संस्थेचे प्राचार्य तसेच गटनिदेशक यांच्यामार्फत प्रवेशाबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. संस्थेत दररोज सकाळी दहा वाजता प्रवेशबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्च शासकीय व मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची यादी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.