आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाेषणा:सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाच्या दर्जास जैन समाजाकडून विराेध ; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन समाजाचे तीर्थधाम सम्मेद शिखर (पार्श्वनाथ तीर्थ) पर्यटनस्थळ म्हणून केंद्र शासनाने घाेषित केले आहे. या निर्णयाविराेधात सकल जैन समाजातर्फे बुधवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलन करण्यात येणार आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.

जैन समाजाच्या दृष्टीने सम्मेद शिखरला विशेष महत्त्व असताना केंद्र शासनाने या तीर्थथळाला पर्यटनस्थळ म्हणून घाेषित केल्याच्या निर्णयास जैन समाजबांधव, आचार्य, साधू-साध्वी यांच्याकडून विराेध हाेत आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकल जैन समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलन केले जाणार असून जैन बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...