आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखर (पार्श्वनाथ तीर्थ) केंद्र शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घाेषित केले आहे. पर्यटनस्थळामुळे या ठिकाणांची धार्मिक पावित्र्य धाेक्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविराेधात देशभरातून जैन समाजबांधवांकडून विराेध केला जात आहे. शहरात देखील या निर्णयाविराेधात जैन समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी (दि. २१) सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करण्याची मागणी सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली.
या निर्णयाच्या विराेधात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. तसेच जैन व्यापारी बांधवांनी दुकानेही बंद ठेवली हाेती. श्री सम्मेद शिखर येथे राेज हजाराे जैन बांधव दर्शनासाठी जातात. या तीर्थस्थळाला केंद्र सरकारने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. पर्यटन वाढल्याने या ठिकाणांचे पावित्र्य धाेक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या निर्णयाविराेधात जैन समाजबांधव, आचार्य, साधू-साध्वी यांच्याकडून विरोध होत आहे. तातडीने केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सकल जैन समाजाने दिला आहे.
येथे पर्यटन क्षेत्र घोषित केल्यास दारू, मांसाहार उपलब्ध होतील व इतर अनुचित घटना घडून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल. केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून झारखंड सरकार तेथे पर्यटक यावेत म्हणून निसर्गप्रेमी तसेच भक्तांच्या भावनांचा विचार न करता काम करणार असेल तर ते आस्थेविरुद्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी गजपंथा ट्रस्टतर्फे सुवर्णा काले, सोनलजी दगडे, शीला गंगवाल, अनिलजी सेठी, विजयजी कासलीवाल, अशोकजी पाटणी, शीतल पाटणी, पारस लोहाडे व प्रकाश झांझरी नाशिकरोडतर्फे डॉ. ठोळे व राजन शहा यांच्यासह ललित माेदी, मंगलचंद साखला, जे. सी. भंडारी, राजेंद पहाडे व जैन समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.