आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रम:जैन  एकताच्या माहेरवाशीण मध्ये ५० महिलांचा कलाविष्कार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेट धरुन हसायला लावणारे एकाहून एक सरस उखाणे..., विविध खेळांमध्ये रममाण महिला. निमित्त हाेते जैन एकता मंचच्या माहेरवाशीण कार्यक्रमाचे. या उपक्रमात ५० हून अधिक महिला सहभागी झाल्या.कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांत सदा व्यस्त असणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जैन एकता मंचच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. सण उत्सवाचा महिना अर्थात श्रावणाचे आैचित्य साधत माहेरवाशीण कार्यक्रम घेण्यात आला.

सर्व महिलांचे हळद-कुंकू लावून, हाताला मेंदी लावून, मायेने लाडूचा गोड घास भरवून, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. महिलांनी विविध खेळ खेळले. सेल्फी पॉइंटवर सर्वांनी फाेटाे काढत जल्लोष केला. उपक्रमात अनेक महिलांनी आपल्या कला सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.संस्थापिका मंगला घिया, अध्यक्षा शिल्पा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम समिती प्रमुख स्मिता साखला, मनीषा बागरेचा, मधू बेदमुथा व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपक्रम राबवला. तृप्ती सोळंकी यांनी काढलेली श्रीकृष्णाची अप्रतिम रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सूत्रसंचालन सुवर्णा चोपडा, वर्षा लोढा, प्रियंका लोढा यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...