आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास:जलदूतांनी जाणून घेतला नद्यांचा इतिहास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसाेच्या दिंडोरी रोडवरील सीडीओ. मेरी हायस्कूलमधील पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या व स्वच्छतेची जाणीव करून देणाऱ्या जलदूत, स्वच्छता दूत आणि पर्यावरण मित्र यांनी मेरी कार्यालयात साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या प्रतिकृतीचे निरीक्षण केले. महाराष्ट्रामध्ये असलेल्या विविध नद्यांचा उगम व संगम यांचा अभ्यास केला. तसेच धरणांचा देखील अभ्यास केला.

संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जलसंस्कृती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंस्कृती मंडळाचे सचिव दिलीप अहिरे यांनी पाणी बचतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन जलदूत तयार केले आहेत. त्याचबरोबर शाळा व परिसराची आणि आपल्या घर व परिसराची स्वच्छता ठेवल्याने आरोग्य उत्तम राहते हा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वच्छता दूतांची निर्मिती केली आहे.

जलदूत, स्वच्छता दूत व पर्यावरण मित्र यांनी मेरी कार्यालयात साकारलेल्या महाराष्ट्राच्या प्रतिकृतीचा अभ्यास केला. मुख्याध्यापक सुनील सबनीस, उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक सुरेखा सोनवणे व चिमन सहारे यांनी सहकार्य केले

बातम्या आणखी आहेत...