आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलांचा हाेणारा वर्षांव, ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या रांगाेळ्या, सनई-चाैघड्याचे वादन अन् दाजीबा वीरांच्या दर्शनासाठी झालेली गर्दी अशा उत्साहाच्या वातावरणात मंगळवारी (दि. ७) धुळवडीला शहरातून दाजीबा वीर मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे यंदा काेराेनाचे निर्बंध हटल्याने या मिरवणुकीत माेठ्या संख्येने नाशिककर भाविक सहभागी झाले हाेते. गंगाघाटावर यात्रा भरली हाेती. धुळवडला शहरातून दाजीबा वीर मिरवणूक काढण्याच्या परंपरेत नवसाला पावणारा वीर अशी आेळख असल्याने या दाजीबा वीरांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात.
जुने नाशिक परिसरातून ४ वाजेच्या सुमारास या मिरवणुकीला प्रारंभ झाला. दाजीबा वीरांचे ठिकठिकाणी महिलांकडून आैक्षण करण्यात आले. यावेळी पारंपरिक वाद्यांवर थिरकत तरुणाईदेखील या मिरवणुकीत उत्साहात सहभागी झाले हाेते. यंदाचा दाजीबा वीराचा मान प्रवीण भागवत यांना हाेता. शंकर, हनुमान, राम अशी विविध देव-देवतांची वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या वीरांचीदेखील गंगाघाटावर मिरवणूक काढण्यात आलेली आहे. हा साेहळ्यासाठी झालेल्या गर्दीमुळे गाेदाघाट परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले हाेते.
नाशिकराेड धूलिवंदनाला नाशिकरोडसह देवळालीत वीरांची मिरवणूक काढण्यात आली. लहान बालकांनी विविध वेशभूषा करून वीर होळीभाेवती नाचविण्यात आले. देवळालीतील मानाचा वीराची व नवसाला पावणारा वीर मिरवणूक कोरडे परिवाराच्या वतीने काढण्यात आली. मनोहर कोरडे यांच्या पिढीने नंतर वीर नाचवले होते. शरद कोरडे, दिनेश कोरडे, बंटी कोरडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.