आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मनसेला खिंडार पाडण्यासाठी सुरुवात केल्यानंतर अॅक्शन माेडवर अालेल्या अमित ठाकरे यांनी पाच महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षांना अापल्या संघटनेतील कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे अादेश दिले. त्यानुसार त्यांनी ५५ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली जम्बाे कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात अाली. प्रामुख्याने तालुकाध्यक्षांसह नगरपालिका असलेल्या तालुक्यातील शहरी भागात अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली अाहे.
जिल्हा संघटकपदी गणेश मंडलीक, जिल्हा सचिव शहर गणेश महाजन तर ग्रामीणसाठी पंकज पगार यांची नियुक्ती केली. माऊली बच्छाव हे सहसचिव तर उपजिल्हाध्यक्ष विशाल शेवाळे यांची नियुक्ती झाली. मालेगाव तालुकाध्यक्ष शुभम खैरनार, बागलाण तालुकाध्यक्षपदी सेनाधिश भामरे, तालुका संघटकपदी गणेश पवार, पंकज मालपुरे यांची तर तालुका सचिव म्हणून किरण शिंदे, यश पाटील, सतीश गुरव, सहसचिवपदी जितेंद्र भामरे, ललीत देवरे, यश भामरे, उपाध्यक्षपदी अनिकेत साेनवणे, स्वप्निल निकम, विपुल पवार, रितेश पवार, पंकज शेवाळे, चेतेश अासरे, सटाणा शहराध्यक्षपदी यश शेवाळे, कलेक्टर पट्टा सहसचिवपदी किशाेर गडरी, सचिन अाहिरे, निशांत जाधव, मालेगाव मध्यमध्ये राेहीत साखला, युवराज खैरनार, खुशाल लाेंडे, गाैरव सूर्यवंशी, नितीन माळी, गाैरव अाहिरे, राज वाघ, जिल्हा संघटक म्हणून समाधान वारूंगसे, दीपक कसबे, सागर बेनके, सहसचिवपदी सागर गाढवे, सचिन भगत, त्र्यंबक जिल्हा उपाध्यक्षपदी ललीत मुळाणे, इगतपुरी जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश उगले, पेठ जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र हिलीम, दिंडाेरी जिल्हाध्यक्षपदी ऋषीकेश झाेटींग, इगतपुरी तालुकाध्यक्षपदी प्रताप जाखेरे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष अनिल चाेथे, सिन्नर तालुकाध्यक्षपदी याेगेश बिन्नर, दिंडाेरी तालुकाध्यक्षपदी अभिजित राऊत, घाेटी शहराध्यक्ष सत्यम काळे, इगतपुरी शहराध्यक्ष सागर भांगरे, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षपद अजिंक्य देवरे, हरसूल शहराध्यक्ष दिनेश लहारे, धनंजय शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्ष तर जिल्हा सचिव म्हणून नीलेश साळवे यांची नियुक्ती झाली. नाशिक शहर, पश्चिम व मध्य जिल्हा सचिवपदी शुभम थाेरात यांची नियुक्ती झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.