आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:जनलक्ष्मी सहकारी बँक निवडणूक; दिग्गजांच्या उमेदवारीने वाढली चुरस

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकसह मुंबई, नवी मुंबई, पुणे, मालेगाव असे कार्यक्षेत्र, ३३ हजार सभासद असलेल्या जनलक्ष्मी बंॅकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचाराचा धुराळा सध्या उडाला आहे. या विस्तृत कार्यक्षेत्रात तब्बल २८३०० मतदारांपर्यंत कमी वेळेत पाेहाेचण्यासाठी माेठी कसरत उमेदवारांना करावी लागत आहे.

बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही काेविडच्या निर्बंधांमुळे निवडणुकीला दाेन वर्ष उशीर झाला. माजी संचालक संजय चव्हाण, रत्नाकर गायकवाड यांसह आशा चव्हाण आणि संदीप नाटकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक चुरशीची बनली आहे. समृद्धी पॅनलची कपबशी निशाणी असून इतर उमेदवारांना पतंग, गॅस सिलिंडर, विमान अशी निशाणी मिळाली आहे. बंॅकेचे अध्यक्ष माजी चेअरमन भालचंद्र पाटील, संजय पाटील यांच्या समीर कांबळे, सागर कांबळे, जयंत जानी आदी प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. १३ नाेव्हेंबरला मतदान तर दुसऱ्याच दिवशी मतमाेजणी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...