आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजय बाबाजी भक्तपरिवाराच्या वतीने अक्षय्य तृतीयानिमित्ताने प्रतिवार्षिक जपानुष्ठान सोहळ्यास नुकताच वेरूळ येथून प्रारंभ करण्यात आला. एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांत आठवडाभरात एक असे एकूण सहा महाजपानुष्ठान सोहळे होत आहे. सोहळ्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अध्यात्मशिरोमणी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमदान, यज्ञ, अखंड नंदादीप, जपानुष्ठान यासह रोज पहाटे नित्यनियम विधी, आरती, भागवत वाचन, ध्यान, प्राणायाम, हस्तलिखित नामजप, प्रवचन, सत्संग होत आहेत.
जातेगाव पर्वत, अंजनेरी पर्वत, रत्नागिरी अशा एकूण २४ दिवसांच्या जपानुष्ठान, महाश्रमदान सोहळ्यानंतर आता आठवडाभर मौनव्रत, उपवास करत वेरूळ येथे शांतिगिरी महाराज जपसाधना करत आहे. ‘श्रमेव जयते.. अर्थातच ‘कामात राम’ अशी शिकवण देणारी श्रमदान परंपराही जोपासत आहे. मौनव्रतात आणि उपवास करत या कालावधीत वेगवेगळे भाविकांनी वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ४८ दिवस जपसाधना करण्यास प्रारंभ झाला आहे. वेरूळ नंतर पाचवे जपानुष्ठान श्रीक्षेत्र काशी आश्रमात २० ते २७ मे दरम्यान होणार आहे. सहावे जपानुष्ठान मध्य प्रदेशातील नर्मदा नदीकिनारी खलघाट येथे ५ ते १२ जूनदरम्यान होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.