आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. पाच-सहा महिन्यांत पतीसोबत पटत नसल्याने जात पंचायतीकडे प्रकरण गेल्यानंतर पंचायतीने पीडित मुलीने जर दुसरे लग्न केले, तर पहिल्या पतीला ५१ हजारांचा दंड द्यावा, असा अजब निर्णय देत मुलीचा घटस्फोट केला. या मुलीच्या पतीला दुसरे लग्न करण्यास मुभा दिली. या कालावधीत मुलीने बाळाला जन्म दिला. आता या मुलीसोबत लग्न कोण करणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. जातपंचायत मूठमाती अभियानकडून पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे एप्रिलमध्ये लग्न झाले होते. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यगलगार कष्टकरी संघटनेचे भगवान मध्ये यांनी हा विवाह थांबवला. विवाहाची त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार दिली होती. सकाळी हा विवाह थांबवला होता. मात्र सायंकाळी मंदिरात मुलीचा विवाह लावून दिला. पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नाही. चार महिने मुलगी तरुणासोबत नांदली. त्यानंतर माहेरी आली. ऑगस्टमध्ये सासरचे लोक आले. दोन्हीकडील ५-५ पंच आले. पंचायतीने २७ सप्टेंबर रोजी पीडित मुलीकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पतीला दुसरे लग्न करण्यास सहमती असल्याचे लिहून घेतले. तसेच पीडित मुलीने दुसरे लग्न केले तर ५१ हजार पहिल्या पतीला द्यावे, असा अजब निकाल पंचायतीने दिला.
प्रसूतीनंतर प्रकार उघडकीस पीडित मुलगी प्रसूतीकरिता सिव्हिलमध्ये आल्यानंतर तिने गावातील दुसऱ्या मुलाचे नाव सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती घेतली असता पीडित मुलीवर दोन वेळा अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.