आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी जानेवारी, एप्रिलमध्ये जेईई मेन ; पहिल्या सत्राची परीक्षा 24 जानेवारीला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी), एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एट्रन्स एक्झाम या जेईई मेनच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून जानेवारी व एप्रिल २०२३ मध्ये परीक्षा होणार असून पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियाही १२ जानेवारीपर्यंत सुरू आहे. मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा होईल. एनटीएतर्फे राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी असलेल्या सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाते.

बी. ई.,बी. टेक, बी. आर्क, व बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी जेईई मेन २०२३ या परीक्षेच्या दोन संधी राहणार असून पहिल्या सत्राची परीक्षा २४ ते ३१ जानेवारी या दरम्यान होईल. तर २ ते १२ एप्रिल या दरम्यान दुसऱ्या सत्राची परीक्षा होईल. संगणकावर आधारित (काॅम्प्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षेच्या रचनेचाही तपशील प्रसिद्ध झाला आहे. नाशिकमध्ये २० ते २५ केंद्रांवर दहा हजारांहून अधिक परीक्षार्थी प्रविष्ट होत असतात.

अशी होईल मुख्य परीक्षा.. जेईई मेन परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न या प्रवेश परीक्षेत विचारले जातील. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या तीन विषयांवर आधारित ९० प्रश्न ३०० गुणांसाठी असतील. ए व बी अशा दोन विभागात परीक्षेचे स्वरूप असेल. ए विभाग हा बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्नांचा असेल तर बी विभागात दहा पैकी पाच प्रश्न सोडवावे लागेल. दोन्ही विभागातील प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू असेल. बी.ई व बी.टेक साठी तीन तासांचा वेळ व बी. आर्क व बी. प्लॅनिंगच्या पेपरसाठी ३ तास ३० मिनिटांचा वेळ असेल. इंग्रजीसह हिंदी, मराठी, कन्नड, बंगाली, मल्याळम, पंजाबी, ओडिया, तमिळ, तेलुगू, उर्दू, गुजराती, आसामी या भाषांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. जेईई मेन परीक्षेतून पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेतली जाणार आहे.

असा करा अर्ज... २४ ते ३१ जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १५ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. १२ जानेवारी २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांना https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हाॅल तिकीट उपलब्ध होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत अर्ज करता येईल. उमेदवारांनी संबंधित वेबसाइटवर अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...