आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कस लागणार!:JEE मेन, NIT इतकीच MHCETची काठिण्यपातळी, 20 % प्रश्न 11वी, 80 %12वीच्या अभ्यासक्रमावर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी. एस्सी. (कृषी) या व्यावसायिक शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या करीता नवीन वर्षात २०२३ मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला.

२० टक्‍के प्रश्‍न अकरावीच्‍या अभ्यासक्रमावर तर उर्वरित ८० टक्‍के प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जेईई मेन्स व नीट परीक्षांच्या स्तराइतकी काठीण्यपातळी एमएच सीईटी परीक्षेला असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासून परीक्षेच्यादृष्टीने तयारी करावी लागणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्यादृष्टीने अभ्यासाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमाचा तपशील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याअंतर्गत प्रश्‍नपत्रिकेचे स्‍वरुप व विचारल्‍या जाणाऱ्या प्रश्‍नांबाबतची माहिती नमूद केलेली आहे. त्‍यानुसार २० टक्‍के प्रश्‍न हे इयत्ता अकरावीच्‍या अभ्यासक्रमावार आधारित असतील. तर ८० टक्‍के प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत.

प्रश्‍नांची काठीण्यपातळी भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) विषयाकरीता जेईई (मेन्‍स) आणि जीवशास्‍त्र विषयाकरीता नीट परीक्षेच्‍या काठिण्यपातळी एवढी असेल. इयत्ता बारावीशी निगडीत प्रश्‍न हे संपूर्ण अभ्यासक्रमातून विचारले जातील. तर अकरावीकरिता विषयनिहाय धडे निश्‍चित करण्यात आले आहेत.

अशी होईल सीईटी परीक्षा

  • एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी तीन पेपर असतील. प्रत्‍येकी १०० गुणांसाठीच्या तीन प्रश्‍नपत्रिका असतील. यामध्ये वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरुपाचे प्रश्‍नांचा (एमसीक्यू) समावेश असेल.
  • महत्वाचे म्हणजे, चुकीच्‍या उत्तरासाठी गुणकपात (निगेटीव्‍ह मार्कींग) नसेल. गणित विषयाकरिता ५० प्रश्‍न (१० प्रश्‍न अकरावी अभ्यासक्रमाचे, ४० प्रश्‍न बारावी अभ्यासक्रमाचे) प्रत्‍येकी दोन गुणांसाठी विचारले जातील.
  • पेपर क्रमांक दोनमध्ये भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्र या विषयांकरीता प्रत्‍येकी एक गुणासाठी ५० प्रश्‍न (दहा प्रश्‍न अकरावी अभ्यासक्रमाचे, ४० प्रश्‍न बारावी अभ्यासक्रमाचे) या प्रमाणे १०० गुणांची प्रश्‍नपत्रिका असेल. पेपर क्रमांक ३ हा जीवशास्‍त्र विषयाचा असून प्रत्‍येकी एक गुणासाठी १०० प्रश्‍नांचा समावेश असेल.
  • त्यातील २० प्रश्‍न अकरावीच्या अभ्यासक्रमावर तर ८० प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असेल. तिन्‍ही पेपरला प्रत्‍येकी ९० मिनीटांचा कालावधी असेल.

एमएच सीईटीला सर्वाधिक विद्यार्थी संख्या

सीईटी सेलतर्फे १४ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या एमएचटी सीईटी परीक्षेला असते. एमएच सीईटी परीक्षेला राज्यभरातून ६ ते ७ लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात.

बातम्या आणखी आहेत...