आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:अशोकनगरला भरदिवसा दागिने तसेच 75 हजारांची घरफोडी

सातपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चामुंडानगर येथील सद्गुरू रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ५ मध्ये राहणाऱ्या याेगेश पवार यांच्या घरात अज्ञात चाेरट्यांनी धाडसी चाेरी करत साेन्याच्या दागिन्यांसह ७५ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.किराणा व्यावसायिक असलेले योगेश पवार हे सदगुरू रेसिडेन्सीमधील फ्लॅट क्रमांक ५ मध्ये राहतात.

दुपारी तीनच्या सुमारास त्यांची पत्नी मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी गेली होती. त्यानंतर त्या साडेतीनच्या दरम्यान घरी आल्या असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच घरातील कपाटात ठेवलेले चार ताेळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. परिसरात आजूबाजूला व्यस्त रहदारी आहे. या आधीही राधाकृष्णनगर येथे नऊ रिक्षांचे टायर चोरी, तसेच तीन ते चार ठिकाणी चेनस्नॅचिंगच्या व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...