आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वडाळा रोड येथे बंद घराचे कुलूप तोडून 3  लाखांचे दागिने चोरीस

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंद घराचे कुलूप तोडून घरातील बेडरूममधील तिजोरीतून ३ लाख ३४ हजारांचे दागिने चोरी करण्यात आले. फातेमा टाॅवर, जेएमसीटी काॅलेजसमोर, वडाळा रोड येथे हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेदा सय्यद नवाज यांच्या तक्रारीनुसार, त्या बाहेर गेल्या असता घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट उघडून तिजोरीतील दागिने चोरी केले. नवाज घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...