आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट नोकरीची संधी:कौशल्य च्या मेळाव्यात ९४ बेरोजगारांना नोकरी

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ऑनलाइन बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तब्बल साडेतीनशे उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यापैकी १३० जणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड होवून ७ प्रमुख अस्थापनांमध्ये ९४ उमेदवारांना आतापर्यंत थेट नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात राज्यभरातून बेरोजगारांना सहभागी होण्याची संधी मिळाली. नाशिक व पुणे जिल्ह्यातील ७ अस्थापनांनी उमेदवारांची निवड केली. विविध ट्रेडच्या २८४ रिक्त पदांसाठी हा मेळावा झाला. त्यामध्ये इपीपी ट्रेनी, प्रोजेक्ट इंजिनिअर, डिप्लोमा, सीओटू वेल्डर, असेम्ब्ली लाइन ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, ट्रेनी सीएनजी ऑपरेटरतसेच आयटी आय उमेदवारांना संधी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...