आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरीसंधी:इ अॅण्ड टी.सी.च्या 85 विद्यार्थ्यांना नाेकरीसंधी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकी शिक्षणातील इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रथमच एकाच वेळी मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी मिळाल्याआहेत. इ. अॅण्ड टी. सी. शाखेतील ८५ विद्यार्थ्यांना महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रिलायन्स, प्राज, क्राॅम्प्टन ग्रीव्हज, बाॅश, इमर्सन, हिंदुजा टेक, फयुरन्सिया व अदानी ग्रुपमधील कंपन्यांत प्राॅडक्शन, मेंटेनन्स, डिझाइन या पदांवर प्लेसमेंट मिळालीआहे. तरआयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, बिर्लासॉफ्ट, अटाॅस यांसारख्या अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश आहे.

सर्वाधिक साडेसात लाखांचे तर सरासरी चार लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले आहे. तसेच इलेक्ट्राॅनिक्स शाखेतील ४५ विद्यार्थ्यांना इमर्सन, हिंदुजा व प्राज या कंपन्यांत संधी मिळालीआहेत. विद्यार्थ्यांना दिलेल्या ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू आणि अॅप्टिट्यूड ट्रेनिंगचा फायदा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड होण्यासाठी झाला. ई. अॅण्ड टी.सी. आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात डाटा अनाॅलिस्ट, प्रोजेक्ट इंजिनिअर, सिस्टिम्स इंजिनिअर, असिस्टंट सिस्टिम्स इंजिनिअर यांसारख्या पदांसाठी निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...