आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:कॅम्पस प्लेसमेंटद्वारे इंजिनिअरिंग व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त संपदा हिरे, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, सीडीसी कमिटीचे अध्यक्ष राजेश शिंदे, महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र भांबर यांचे मार्गदर्शन लाभले.

मविप्रच्या ५५ विद्यार्थ्यांची निवड : मविप्र संस्थेच्या अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सॅप यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नुकतीच ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली.

कॅपजेमिनी, कॉग्निझंट, एचसीएल, टीसीएस, एटिटी डेटा आणि इतर काही कंपन्यांनी ३.५ लाख ते ५.५ लाख पॅकेज देऊन विद्यार्थ्यांची निवड केली. जगातील सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये सॅप प्रणालीचा वापर होत आहे. या प्रणालीवर काम करण्यासाठी सॅप सर्टिफिकेशन करणे गरजेचे असते. सॅप प्रशिक्षणाची सुरुवात संस्थेच्या ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१५ पासून झाली. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सतीश देवणे आणि उपप्राचार्य प्रा. नितीन देसले यांचे मार्गदर्शन लाभले. सॅप समन्वयक महेश चौधरी व प्लेसमेंट अधिकारी विनीत देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...