आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांमध्ये निवड:नामांकित कंपन्यांत मातोश्रीच्या २७४ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील २७४ विद्यार्थ्यांची पूल कॅम्पस ड्राइव्हद्वारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यात संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ८२ जणांना इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, कॅपजेमिनी, पर्सिस्टंट, विप्रो, व्हर्टिस, डाटाग्रीड कंपन्यांमध्ये निवड झाली.

इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनच्या ३४ विद्यार्थ्यांची धूत ट्रान्समिशन, फॉर्च्युना इंजिनिअरिंग, पर्शियन टेक्नॉलॉजी या कंपन्यांत तर सिव्हिलच्या २२ विद्यार्थ्यांना सेंट्रल वॉटर कमिशन, इन्फोसिस, एबीएल इन्फ्रा या कंपन्यांत संधी मिळाली. यांत्रिकी अभियांत्रिकीच्या ४१ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर, यांत्रिकी व वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...