आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकचळवळीत सहभागी होऊन, नाशिकला व्यसनमुक्त करू:सुन्नी दावते इस्लामचे प्रवक्ते मौलाना सय्यद अमीनूल कादरींचे प्रतिपादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग होण्याची गरज आहे. जे लोक अमली पदार्थ विक्री करतात, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कुराण व हदीसमधून आपल्याला याबाबत मार्गदर्शन मिळते. या लोकचळवळीत सहभागी होऊन नाशिकला व्यसनमुक्त करू या, अशी साद सुन्नी दावते इस्लामचे प्रमुख प्रवक्ते मौलाना सय्यद अमीनूल कादरी साहब यांनी घातली.

जुने नाशिक येथिल चौकमडई येथे 'ड्रग्ज फ्री नाशिक' या महिमेअतगृत सुन्नी दावते इस्लामी या सस्थेकडून आयोजित अमलीपदार्थ विरोधी जनजागृती सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऑल इंडिया सुन्नी जामियतुल उलमाचे अध्यक्ष जेष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद मोईन मिया,सय्यद आसिफुल जिलानी साहब,सय्यद अल्ताफ अली साहब,खतिब ए शहर हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब,हाफिज समीर साहब,उपस्थित होते.

पुढे बोलतांना सय्यद अमिन म्हणाले की, अमली पदार्थांचे व्यसन हे समाजासाठी विनाशकारी आहे. तरुणांबरोबरच शालेय विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. सध्याची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता, अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहीम राबवून, लोकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक परिचिताला व्यसनापासून परावृत्त करावे. जेणेकरून व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचविता येईल. राजकीय नेत्यांनीदेखील आपली समाजाप्रतिची जबाबदारी निभवण्याची वेळ आली असल्याचे ही त्यांनी सागितले.हजरत सय्यद मोईन मिया यांनी प्रशासनालाही उद्देशून सांगितले की, नशेखोरीमुळे शहरात गुन्हेगारी, अपघात आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी अमली पदार्थांची आयात व विक्री करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. प्रार्थनेने सभेची सांगता झाली.

राज्यभरात राबविणार नशाविरोधी मोहीम

दरम्यान, हजरत सय्यद मोईन मिया यांनी बोलतांना सागितले की,अनेक तरुण एमडी ड्रग्ज, गांजा, अफू, चरस, कोकेन आदी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचे मोहीमेत समोर आले आहेत.यामुळे आता सपूर्ण महाराष्ट्रात नशाविरोधी मोहीम राबविली जाणार असून शहरातील प्रत्येक मशिदींचे मुख्य इमाम, शिक्षक, पालक, समाजसुधारक,पत्रकार आणि राज्यकर्ते यांनी अमली पदार्थांपासून तरुण पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी नाशिकमध्ये तहेरीके आशिक-ए-रसुल कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे.ही कमेटी आता या विषयावर काम करणार आहे.या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शुक्रवारी जुम्माच्या नमाजामध्ये नशामुक्तीवर प्रवचन होणार आहे. यासाठी एसऒपी तयार करण्यात आली असल्याचे मोईन मिया यांनी सागितले.

बातम्या आणखी आहेत...