आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे सीएमई येथे महाराष्ट्र राज्य रोईंग संघटनेने आयोजित केलेल्या ज्यूनियर रोईंग राष्ट्रीय स्पर्धेची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. सदर निवडचाचणीतून महाराष्ट्र रोईंग संघाची निवड करण्यात आली. या संघात नाशिकच्या वॉटर्स एज बोटक्लबच्या 6 महिला व 1 पुरुष खेळाडूची निवड करण्यात आली.हैद्राबाद येथे हाेणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी हा खेळांडूची निवड झाली आहे.
सदर निवड झालेल्या खेळाडूंचा स्पर्धापूर्व सराव शिबिर नाशिकच्या वॉटर्स एज बोटक्लब येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे व अनिकेत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले हाेते. या प्रशिक्षणा स्पर्धकांना सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा देतांना माजी महापौर प्रकाश मते यांनी खेळाडूंनी सदर स्पर्धेत पदक मिळून नाशिकचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. राेईंगमध्ये नाशिकच्या खेळांडूना दबदबा कामय राहिला आहेे. अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरी स्पर्धेत खेळांडूनी लक्षणीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले हाेते. या खेळांडूच्या निवडीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खेावला गेला आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक विक्रांत मते, प्रशिक्षक अंबादास तांबे, अविनाश देशमुख, अनिकेत तांबे, पूजा जाधव, राहुल काकड, प्रसाद जाधव, प्रताप देशमुख, बापू मानकर, मिलिंद कदम, आदी उपस्थित होते.
स्पर्धेत निवड झालेले खेळाडू
कॉकलेस फोर : सानिका तांबे, सृष्टी जाधव, प्रांजल जाधव, साक्षी दुग्गड.
फॉक्स एट साठी : रिद्धी लोखंडे, मानसी भोर, सानिका तांबे, सृष्टी जाधव,
साक्षी दुग्गड, प्रांजल जाधव. पुरुष राखीव खेळाडू सोहन कुमार शेवाळे याची निवड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.