आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमकदार कामगिरी:के. एन. केला च्या क्रीडा महोत्सवाची सांगता

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेलरोड येथील दि. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित के. एन केला शाळेमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले.यावेळी महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिस नाईक अश्विनी देवरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. अश्विनी देवरे यांनी कझाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवला आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या आयर्न वूमन होण्याचा रेकॉर्ड त्यांनी केल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. देवरे यांनीही विद्यार्थ्यांना खेळात सहभागी होऊन शारीरिक आणि मानसिक फिटनेस ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी विद्यार्थ्यांची १००, २०० मीटर धावणे, रिले, डॉज बॉल, क्रिकेट, हॉकी यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनीवास लोया, विजय चोरडिया, अरविंद क्षीरसागर, के. एम. बोराडे, सतीश कलंत्री, शिरीष दंदणे, झुंबरलाल उपाध्याय, बी. बी. दंदणे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...