आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकता मार्गदर्शन:दिंडोरीत काैशल्य विकासचा रोजगार मेळावा 28 ला ; विविध नामांकित कंपन्यांचा राहणार सहभाग

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडोरी-वणी येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात आर्ट‌्स, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात हा मेळावा २८ डिसेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान पार पडेल.

मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या / नियोक्तेदेखील उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येतील. कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. काही अडचणी आल्यास ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे. मेळाव्यातून राेजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याने समाधान व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...