आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या संधी:काैशल्य विकासचा आज रोजगार मेळावा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मानदंड सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ, नाशिक आणि गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ७) एचपीटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ३१ विविध कंपन्यांतील २००० पेक्षा अधिक पदांवर उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील बेराेजगारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्धीसाठी “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात येत आहे. एकूण ३१ नामांकित कंपन्या व नियोक्ते २००० हजारपेक्षा जास्त पदांकरिता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक येथे उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...